बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवण्यात येणारी योजना आहे . बांधकाम कामगार या योजनेमध्ये श्री व पुरुष या दोन या दोघांचाही समावेश आहे .बांधकाम कामगार हा एक असंघटित कामगार आहे. अशा कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना मध्ये अनेक लाभ बांधकाम कामगारांना दिले जातात.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. त्रिपक्षीय मंडळाची स्थापना अधिनियम 1996 व नियम 2007 मधील तरतुदीनुसार केलेली आहे. या योजनेचा चा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 01 मे 2011 रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे.बांधकाम कामगार योजना फायदे सदरील अधिनियमानुसार बांधकाम कामगारांना मिळतात. बांधकाम कामगार यादी मध्ये बांधकाम कामगारांना नाव समाविष्ट करण्यासाठी बांधकाम कामगार योजना फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो.

बांधकाम कामगार योजना पात्रता :-

  • १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  • मागील बारा महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
  • बांधकाम कामगार योजनेमध्ये अनेक कल्याणकारी योजनेचा समावेश होतो. सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक, आरोग्य विषयक, आर्थिक असे बांधकाम कामगार योजनांमध्ये मिळणाऱ्या योजनेचे गट पाडलेले आहेत. बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म भरून सदरील योजनेचा बांधकाम कामगार फायदा घेऊ शकतो. बांधकाम कामगार योजना फॉर्म आपल्याला महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे . बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी शासनाने आपल्याला संकेतस्थळ https://mahabocw.in/ उपलब्ध करून दिलेले आहे. या संकेतस्थळावरती आपण भेट देऊन सदरील बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकतो .या योजनेमध्ये अनेक प्रकारच्या योजनेचा समावेश केलेला आहे ,चला तर पाहूया बांधकाम कामगार योजना संदर्भात सविस्तरपणे.

1) सामाजिक सुरक्षा योजना

 
Bandhakam kamgar  सामाजिक सुरक्षा योजना मध्ये मध्यान्न भोजन योजना, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण व प्रशिक्षण योजना, पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती साठी 30 हजार रुपये अशा योजनेचा समावेश या सामाजिक सुरक्षा मध्ये केला जातो. या बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून आपणBandhakam kamgar yojana फायदे मिळू शकतो.
शैक्षणिक योजना

शैक्षणिक योजनेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500 इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 75 टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक असते.
इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 % किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात. इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी 10 हजार रुपये दिले जातात.
पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20 हजार नोंदीत कामगाराच्या पत्नीसह लागू केले जाते.
वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपये अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी 60 हजार रुपये सदरील योजना नोंदीत कामगाराच्या पत्नीस सही लागू पडते.
नोंदणी बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती

Bandhakam kamgar yojana  योजनेमध्ये शासनाने केलेली आहे.
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20000 शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25000 .
Bandhakam kamgar yojana  मध्ये आरोग्य विषयक योजनेमध्ये मिळणारे लाभ आपण पाहणार आहोत .

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15000 शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20000 सदरील योजना दोन जीवित अपत्यासाठी लागू होणार आहे.
गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1 लाख लाभार्थी कामगार त्यांच्या किंवा तिच्या कुटुंबीयांनाच हेच योजना लागू होणार आहे .
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख मुदत बंद ठेव असा लाभ यामध्ये मिळणार आहे.
2 लाख 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ या ठिकाणी आपल्याला मिळणारे.
आरोग्य तपासणी करणे यामध्ये याचाही लाभ मिळणार आहे.

Bandhakam kamgar yojana मध्ये बांधकाम कामगारांना आर्थिक लाभ खालील प्रमाणे मिळणार आहे.

बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला तर बांधकाम कामगाराच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये मदत शासनाद्वारे केली जाते.
बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये बांधकाम कामगाराच्या वारसास दिले जातात.
बांधकाम कामगार अटल बांधकाम कामगार आवास योजनेद्वारे बांधकाम कामगारांना शहरी विभागासाठी 2 लाख रुपये , ग्रामीण विभागासाठी 2 लाख रुपये असे अर्थसहाय्य दिले जाते.
कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता 10 हजार रुपये यासाठी बांधकाम कामगाराची वय 50 ते 60 असणे आवश्यक आहे.
कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा श्री कामगाराच्या विदुर पतीस 24 हजार रुपये 5 वर्षाकरिता दिले जातात .
गृह कर्जावरील 6 लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाख रुपये असे अर्थसहाय्य बांधकाम कामगारांना दिले जाते.

 

 

 

 

Leave a Comment